मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 2 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामतीत एका महिन्याचा पाऊस एका रात्रीत पडला

mnewsmarathi 02 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,792 वाचन

 

प्रतिनिधी

पहाटेपासून (ता. 2) बारामती शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बारामतीला अक्षरशः झोडपून काढले आहे.

एका महिन्याचा पाऊस एका रात्रीत पडल्यामुळे बारामतीकर सुखावले आहेत. सकाळी सात वाजेपर्यंत बारामती शहरांमध्ये 158 मि.मी.

पावसाची नोंद झाल्याची माहिती बारामतीचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.

बारामती शहरात पहाटेपासूनच पावसाला प्रारंभ झाला होता. पावसाचा वेग त्यानंतर कमालीचा वाढला. मुसळधार पावसाने जवळपास अडीच ते तीन तास बारामतीला अक्षरशः जोडपून काढले.

या पावसाचा वेग प्रचंड होता त्यामुळे अनेक जण पहाटेपासूनच जागे होते. या पावसाने बारामती शहरातील सर्व सखल भागात तळी साचली आहेत.

बारामती शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत नाही, मात्र हा दिवाळीतील पाऊस बळीराजाला काहीसा दिलासा देऊन जाणारा ठरला आहे.

गेल्या काही दिवसापासून बारामती शहराला देखील टंचाईचे सावट भेडसावत होते, त्या पार्श्वभूमीवर पावसाची आवश्यकता नागरिक बोलून दाखवीत होते. पावसाने बारामतीवर कृपादृष्टी दाखवीत अतिशय दमदार आगमन केल्यामुळे लोकही सुखावले आहेत.

सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बारामती शहरात पावसाचा जोर कायम होता यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसत होते. बारामती शहरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते.

पावसाच्या पाण्याचा जोर इतका वेगवान होता की हे पाणी वाहून जायला जागाच शिल्लक राहिली नव्हती.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi