प्रतिनिधी
सोमेश्वर कारखाना १५ ऑक्टोंबर २०२६ रोजी सुरू झाला आहे. आज अखेर २६०१३४ एवढे गाळप होवुन २८५३५० एवढी साखर पोती तयार झालेली आहेत. तसेच पुणे व आसपासचे जिल्हे पाहता सर्वात जास्त रिकव्हरी म्हणजे ११.०४ सोमेश्वर कारखान्याची आहे. गेल्या आठवडयात स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम्हा सर्व शेतकऱ्यांचे नेते श्री राजु शेट्टी साहेब यांनी सध्याची साखरेची व उसाची परिस्थिती पाहता पश्चिम भागातील सर्वच कारखान्यांनी पहिला हप्ता ४५००/-प्र.मे.टन द्यावा अशी मागणी केली होती. परंतु कारखानदार व सरकार या मागणीसाठी प्रतिसाद देत नसल्याने आंदोलन करून पुणे- बैंगलोर रस्ता वाहतुक बंद करून सातारा, सांगली, कोल्हापुर या जिल्हयातील सर्वच कारखाने बंद पाडले होते. त्यावर तोडगा म्हणुन सरकार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात चर्चा होवुन पहिला हप्ता ३९००/- रूपये देण्यात यावा असा निर्णय झाला या सर्व बाबी सोमेश्वरच्या संचालक मंडळास माहीत असतीलच मी व कृती समितीचे सदस्य कारखान्याचे संस्थापक सभासद असल्यामुळे पंचकृशीतील भौगोलीक परिस्थिती पाहुन शेतकरी सभासदांचे नुकसान होवु नये म्हणुन राजु शेट्टी साहेब यांची परवानगी घेवुन शेतकरी कृती समितीने कारखाना चालू ठेवणे विषयी कुठेही अडचण निर्माण केली नाही.
सोमेश्वर कारखान्याची परिस्थिती चांगली असल्याने नवीन संचालक मंडळाने तात्काळ संचालक मंडळाची मिटींग घेवुन ३९००/- रू प्र.मे.टन पहिला हप्ता देवुन पुणे जिल्हा व आसपासच्या जिल्हयातील कोंडी फोडावी. शेतकरी कृती समितीने नवीन संचालक मंडळाला पुर्ण ताकदीनिशी पाठींबा दिल्यानेच चांगल्या मताधिक्याने आपला पॅनेल निवडुन आला आहे याचा विसर संचालक मंडळाला पडु देवु नये अशीही विनंती अपणास करण्यात येत आहे. वास्तविक कायद्यानुसार उस तुटल्यानंतर १४ दिवसात उस बील देणे बंधनकारक आहे. परंतु १४ दिवसात उस बील न दिल्यास त्यावर १५% प्रमाणे व्याज द्यावे लागते असे असतानाही कृती समिती सर्व विचार करता संचालक मंडळाला व्याजाची रक्कम न मागता संचालक मंडळाला पैशांची पुर्तता करण्या करीता दि. २५/११/२०२६ पर्यंत वेळ देत आहे. परंतु २५/११/२०२६ नंतरही संचालक मंडळाने यावर कोणताही निर्णय न घेतल्यास शेतकरी कृती समिती व मा. राजु शेट्टी साहेब अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या पुढाकाराने कृती समितीस नाईलाजास्तव काटाबंद आंदोलन करावे लागेल. संचालक मंडळास काही अडचण असल्यास कृती समितीस चर्चेसाठी बोलाविल्यास आम्हीही चर्चेस तयार आहोत व चर्चेतुन मार्ग काढण्यास आम्ही तयार आहोत. परंतु ही वेळ संचालक मंडळाने येवु देवु नये अशी शेतकरी कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार सो यांनीही पहिला हप्ता 3900/-रूपये प्र.मे. टन देण्यात यावा असे निर्देश संचालक मंडळाला करावेत अशी नम्र विनंती शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
