• Home
  • राजकीय
  • निंबुत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
Image

निंबुत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

संपादक मधुकर बनसोडे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात निंबूत येते साजरी करण्यात आली.
मिलिंद तरुण मंडळ च्या सर्व सदस्य पदाधिकारी यांनी अस्थिस्मारक जेजुरी येथून धम्मज्योत पायी नींबूत येथे आणली होती निंबुत मध्ये धम्म ज्योतीचे आगमन सकाळी नऊ वाजता झाले.

यावेळी ढोल, ताशा,हलगी, या पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात आला. सकाळी दहा वाजता बौद्ध विहार नींबूत येथे धम्म वंदना घेण्यात आली. यावेळी छोट्या छोट्या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सतीश काकडे, प्रमोद काकडे, उदय काकडे, नींबूत ग्रामपंचायत उपसरपंच अमर काकडे, नंदकुमार काकडे, वार्ताहर संभाजी काकडे, विक्रम काकडे,ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे. निंबुत ग्रामपंचायत सरपंच निर्मलाताई काळे, सदस्य कुमोदिनी काकडे, विद्यादेवी काकडे, ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब, क्लार्क भाऊसो कोळेकर, आधी सदस्य कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज सायंकाळी सहा वाजता चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. यांच्या वतीने मिलिंद तरुण मंडळ नींबूत यांच्या विशेष प्रयत्नातून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मिलिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बनसोडे यांनी दिली

Releated Posts

केंद्रात, राज्यात ‘ हिरो ‘ ; बारामतीत मात्र ‘ झिरो’….

प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त.. पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या व जवळपास विरोधी…

ByBymnewsmarathi Feb 11, 2026

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा…

ByBymnewsmarathi Jan 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा – प्रकृती कारणास्तव पदत्याग

प्रतिनिधी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2025