• Home
  • माझा जिल्हा
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप
Image

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप

प्रतिनिधी

 पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् व ओमा फाऊंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे देण्यात आलेल्या १० ई-स्कुटरचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

 तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडीला ६, होळ-६, काटेवाडी-३, लोणी भापकर-३, माळेगाव बु-४, मोरगाव-७,मुर्टी -२, पणदरे-३, सांगवी-४, शिर्सुफळ-५, बारामती नगर परिषद-७ असे एकूण ५० ई-स्कुटर वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित ४० ई-स्कुटरचे दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.

या स्कुटरचा उपयोग दैनंदिन आरोग्य सर्वेक्षण, गरोदर मातेच्या प्रसुतीकाळात त्यांच्यासोबत आरोग्य केंद्रात जाण्याकरीता तसेच इतर आवश्यक त्या आरोग्य सेवेसाठी आशा स्वयंसेविकांना होणार आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026