• Home
  • क्राईम
  • एकतर्फी प्रेमातून महिलेसह सासूवर हल्ला; हल्लेखोर तरुण पसार
Image

एकतर्फी प्रेमातून महिलेसह सासूवर हल्ला; हल्लेखोर तरुण पसार

प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून एकाने महिला आणि तिच्या सासूवर हल्ला केल्याची घटना कोंढवा भागात घडली. पसार झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीने महिलेच्या सासूच्या डोक्यात सिलिंडर मारल्याने दुखापत झाली. याप्रकरणी भीमाशंकर (पूर्ण नाव समजलेले नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात सहायक परिचारिका आहे. आरोपी भीमाशंकर रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे. गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर महिलेला त्रास देत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगून तिचा पाठलाग करायचा.

महिला कोंढवा भागात राहायला आहे. आरोपी तिच्या घरी गेला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे त्याने सांगितले. तेव्हा मी विवाहित असून, मला दोन मुले आहेत, असे तिने सांगितले. त्या वेळी महिला, तिचा मुलगा, सासू, जाऊ घरात होते. मला त्रास देऊ नको, असे तिने त्याला सांगितले. त्यानंतर आरोपी भीमाशंकरने महिलेच्या घरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सासूने त्याला जाब विचारला. तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्या वेळी घरात असलेल्या जावेने खोलीचा दरवाजा बंद केला. तिने परिसरातील रहिवाशांना या प्रकाराची माहिती दिली. आरडाओरडा ऐकून रहिवासी तेथे जमा झाले. तेव्हा बंद खोलीत असलेल्या भीमाशंकरने सिलिंडरने दरवाजा तोडला. त्या वेळी सासू, महिलेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. महिला आणि सासूवर भीमाशंकरने सिलिंडर फेकून मारण्याचा प्रयत्न केला. झटापटीत सिलिंडर महिलेच्या सासूच्या डोक्याला लागल्याने दुखापत झाली. दरवाजा उघडून तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या भीमाशंकरचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026