बीबीए बीसीए सीईटी परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा आयोजन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स ,सायन्स अँड कम्प्युटर एज्युकेशन माळेगाव बुद्रुक या महाविद्यालयात बीबीए ,बीसीए सीईटी परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ या वर्षाकरिता बीबीए आणि बीसीए या कोर्सला प्रवेश घेण्याकरिता प्रथमच अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाने सीईटी परीक्षेचे आयोजन दिनांक २९ मे २०२४ रोजी केलेले आहे. बीबीए व बीसीए या कोर्सला आत्तापर्यंत महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश दिला जायचा परंतु या शैक्षणिक वर्षापासून सदरच्या कोर्सला प्रवेश घेण्याकरिता सीईटी परीक्षा बंधनकारक केलेली आहे. प्रथमच होणाऱ्या या प्रवेश परीक्षेच्या तयारी करिता महाविद्यालयाने १५ मे ते २२ मे २०२४ दरम्यान एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या एक आठवड्याच्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना बीबीए,बीसीए सीईटीची तयारी तसेच प्रवेश प्रक्रिया संदर्भातले पूर्ण मार्गदर्शन महाविद्यालयामार्फत केले जाणार आहे. सदरची कार्यशाळा ही पूर्णतः मोफत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे सचिव डॉक्टर धनंजय ठोंबरे व प्राचार्य डॉक्टर अजित चांदगुडे यांनी केले आहे. सदर कार्यशाळेचे आयोजन व समन्वय प्राध्यापक चंद्रकांत जाधव, प्राध्यापक रवी सस्ते व प्राध्यापक सीमा पोंदकुले यांनी केले आहे.