प्रतिनिधी
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन माळेगाव (बु.) मध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे सर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.अनुराधा चव्हाण यांनी केले होते.