प्रतिनिधी
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान निंबुत संचलित, श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत व पिंपरे खुर्द या संस्थेच्या दोन्ही विद्यालयांनी गेल्या वीस वर्षाची इ. १०वी च्या १००% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळविले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इ. १०वी च्या मार्च २०२४ परीक्षेचा दोन्ही विद्यालयांचा निकाल १००% लागला आहे…
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आपली आर्थिक परिस्थिती आड येऊ नये म्हणून संस्थेच्या वतीने गेली २०वर्ष मोफत शिक्षण दिले जाते तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून इ.१० वी च्या परीक्षेत ८५ % पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे ते मुंबई मोफत विमान प्रवास घडवला जातो.संस्थेच्या या उपक्रमांचा फायदा आजपर्यंत अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना झाला आहे. तसेच दोन्ही विदयालयाची रोप्यमोत्सहवी वर्षात वाटचाल करीत आहे
*निंबुत विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे…*
*प्रथम* – केंजळे वेदांत चंद्रकांत ९०.६०%
*द्वितीय* – निगडे मेघराज सनी ८६.००%
*तृतीय* – गोंडे साहिल दादासाहेब ८५.६०%
*पिंपरे खुर्द विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे..*
*प्रथम* – विश्व भगवान कुसेकर ९१.६०%
*द्वितीय* – कु. वैष्णवी दत्तात्रय थोपटे ८६.६०%
*तृतीय* – अल्बाज अल्ताफ शेख ८६.४०%
दोन्ही विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर, मानद सचिव माननीय श्री मदनराव काकडे दे., निंबुत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे, पिंपरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कैलास नेवसे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.