• Home
  • क्राईम
  • बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण
Image

बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण

प्रतिनिधी

बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अर्जुन दिवेकर, हवालदार नीलम कर्पे, माया गाडेकर, योगिता आफळे, दोन महिला पोलीस शिपाई, तसेच अक्षय जीवन आवटे (वय ३१, रा. सोमवार पेठ), आदित्य गौतम (वय ३०, रा. साततौटी चौक, कसबा पेठ), सुजीत पुजारी (रा. आंबेगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह अन्य आरोपींविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेने बलात्कार प्रकरणी आरोपी सुजीत पुजारी, आदित्य गौतम यांच्याविरुद्ध मार्च २०२३ मध्ये तक्रार दिली होती. पती अक्षय आवटे याने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पुजारी, गौतम, आवटे यांच्याविरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडे तक्रार दिल्याने आरोपी चिडले होते. २३ मार्च २०२३ रोजी महिलेला समर्थ पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. पती अक्षय, त्याचे मित्र पुजारी आणि गौतम यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. समर्थ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात बोलाविले. पोलीस ठाण्यात मला उपनिरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पट्ट्याने मारहाण केली, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला.

आरोपी पुजारी, गौतम सोमवार पेठेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला धमकावले. माझ्याकडे पाहून ते थुंकले, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करत आहेत.

Releated Posts

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; महामार्गावर बस लुटणारी टोळी गजाआड, सव्वा कोटींची चांदी जप्त

प्रतिनिधी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर धाडसी दरोडा टाकून कुरियर बसमधील सव्वा कोटींची चांदी लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

बारामतीत गुन्हेगारांची गय नाही! सराईत गुंडांवर तडीपारीची कुऱ्हाड; पोलिसांचा कडक पवित्रा

प्रतिनिधी ​दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम बारामती शहर आणि तालुक्यात वारंवार गंभीर गुन्हे…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बारामतीत पोलिसांचा थरार; धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी ​दहशत पसरवण्याचा प्रयत्न फसला; पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई बारामती शहर आणि परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025

बारामतीत पोलिसांचा ‘महामोहीम’ तडाखा; गुणवडी, जळोचीसह नीरा वागजमधील अवैध धंदे उद्ध्वस्त

प्रतिनिधी ​१५ जणांवर गुन्हे दाखल; ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, गावठी दारूचे रसायन केले नष्ट बारामती शहर आणि…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025