प्रतिनिधी – फिरोज भालदार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा निर्माण केलेल्या संघटनेला २० जुलै रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत , या शताब्दी वर्षानिमित्त वडगाव निंबाळकर येथे १४ जुलै रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे ( workshop ) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भारतीय संविधान व यामध्ये कोणते कायदे ( Law ) आहेत आणि ते आमलात कसे आणले याविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक ऍड. पवनकुमार शिंदे (उच्च न्यायालय, (औरंगाबाद) छ.संभाजी नगर ) , प्रमुख वक्ते सिद्धार्थ शिनगारे यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमामध्ये भारतीय संविधानाचा इतिहास , संविधान म्हणजे काय? , भारतीय संविधाना समोरील आव्हाने आणि उपाय ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारे संविधान, संविधान बदलणे शक्य आहे का? , संविधान दुरुस्ती की संविधान संशोधन? कोणता शब्द बरोबर आहे? , संविधानाच्या विरोधातील शक्ती कोणत्या आहेत? याचप्रकारे विविध विषयांवरती मार्गदर्शन ऍड . पवनकुमार शिंदे व प्रमुख वक्ते सिद्धार्थ शिनगारे यांनी केले.
इतिहास काळ ,ब्रिटिश काळ ते आत्तापर्यंत कश्याप्रकारे कायदे ( Law ) कसे झाले ते आमलात कष्याप्रकारे आणले याविषयी आश्याच प्रकारचे भारतीय संविधान यांविषयी माहिती ( Information ) देण्यात आली . कार्यक्रमामध्ये विविध भागातून महिला व पुरुषांनी या एकदिवसीय कार्यशाळा ( workshop ) मध्ये सहभाग घेतला होता . हा कार्यक्रम वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत हॉल येथे पार पडला . कार्यक्रमाला उत्सूर्फ असा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन मौर्य क्रांती महासंघ बारामती तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते .