बारामती! मनिषा नरळे हिची पोलीस शिपाई पदी निवड झाल्याबद्दल सदोबाचीवाडी येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथील मनिषा गोरख नरळे हीची नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये पोलिस शिपाई पदी निवड झाली यानिमित्त सदोबाचीवाडी येथे तिचा सत्कार समारंभ व भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पो.हवालदार सागर चौधरी , शेंडकर सर , दनाने मॅडम व मा. सरपंच सदोबाचीवाडी विलास होळकर यांचे हस्ते मनिषा चा सत्कार करण्यात आला.

मनीषाने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण होळ येथील आनंद विद्यालय याठिकाणी घेतले. सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालयात ११ वी आणि १२ वीचे शिक्षण घेतले. अकरावीमध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले. पदवीचे शिक्षण बाहेरूनच पूर्ण केले व पोलिस भरतीसाठी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेतला.वडिलांचे निधन झाल्याने मनिषाची जिम्मेदारी सर्व तिच्या आईवर आली होती त्यांनी दुसऱ्याच्या रानात काम करून आपल्या मुलीला शिकवले व तीला प्रोत्साहन दिले .

मनिषा ची घरची परिस्थिती हालाकीची असून देखील तीनी जिद्दिने आपले स्वप्न पूर्ण केले व तिच्या प्रयत्नाला यश मिळाले . तिने कोल्हापूर जिल्ह्यातील भरतीसाठी अर्ज भरला होता. मैदानी चाचणीमध्ये २६ व लेखी परीक्षेमध्ये ८८ गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गातून तिची पोलिस शिपाईपदी निवड झाली .या यशाबद्दल तिचे विविध भागातून अभिनंदन होत आहे. कार्यक्रमासाठी श्रीनाथ म्हस्कोबा तरुण मंडळ , तसेच सादोबाचीवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.