प्रतिनिधी.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या उत्साहात निंबूत येथे साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर रांगोळी काढून फुलांनी स्मारक सजवण्यात आले होते. अण्णाभाऊंचे विचार घेऊन जर तरुण पिढी पुढे वाटचाल करत राहिली तर नक्कीच यशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष किरण खंडाळे यांनी दिली.
अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कादंबऱ्या अनेक पोवाडे देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील प्रसिद्ध आहेत अशा या थोर विचारवंत साहित्यरत्न लोक रत्नास 103 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा काळू शेठ सोनवणे यांनी दिल्या. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित निंबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमर भैया काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बनसोडे,चंद्रशेखर काकडे, प्रणव बनसोडे, पोलीस पाटील साळवे, व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते