लोकनेते सहकारमहर्षी कै. बाबालालजी काकडे दे.यांच्या स्मृतीदिना निमीत्त अभिवादन..

Uncategorized
  1. प्रतिनिधी.
    शनिवार दि.३ऑगस्ट २०२४ रोजी लोकनेते, सहकारमहर्षी कै. बाबालाल साहेबराव काकडे दे. यांच्या स्मृतिदिन आहे. बाबांच्या स्मृतिदिनानिमित्त निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात, १ऑगस्ट रोजी, बारामती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा लहान गट व मोठ्या गटात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण १३ शाळांमधील ६४ स्पर्धकांनी भाग घेतला. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व उत्कृष्ट पद्धतीने सादर केले.
    वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बाबांच्या प्रतिमेचे, लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले सोमेश्वर येथील मुगुटराव साहेबराव काकडे दे. महाविद्यालयाचे प्राध्यापक मा.श्री. खोमणे सर , प्राध्यापिका यादव मॅडम, माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी येथील शिक्षक मा.श्री. भोसले सर यांनी केले.
    ३ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. या स्पर्धेचे परीक्षण मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या प्राध्यापक मा. श्री.जे. डी.खोमणे,प्राध्यापिका यादव मॅडम,माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी विद्यालयातील शिक्षक मा.श्री.भोसले सर यांनी केले.
    विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनीआपल्या प्रास्ताविकात तालुकास्तरीय घेतल्या जाणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेची यशस्वी परंपरा सर्वांसमोर मांडली. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे. मानद सचिव मा. श्री. मदनराव काकडे दे.यांनी घेतल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजाराम भगत यांनी केले व आभार श्री.राजेंद्र खुडे यांनी मानले.