कन्यादान योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या नवविवाहित दांपत्य आणि विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येते आहे.

सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दांम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात २५ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. अनुदाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात थेट लाभार्थी हस्तांतरण पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येणार आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता स्वयंसेवी संस्थेनी विहित नमुन्यातील विवाहाची माहिती सादर करण्याचा प्रस्तावाचा नमुना, हमीपत्र व प्रतिज्ञापत्र अर्जासोबत सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक कार्यालय, इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय भवन, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे सहाय्यक संचालक विशाल लोंढे यांनी केले आहे.