प्रतिनिधी – फिरोज भालदार
वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ (मुलींची ) येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेल्या मोफत बूट-मोज्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, व सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी मधील १२९ विद्यार्थिनींना बूट मोजेंचे व ५० विद्यार्थिनींना मंथन , NSSE परीक्षेचे प्रमाणपत्र व ट्रॉफीचे वाटप करण्यात आले.
याकामी केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड, विस्ताराधिकारी संजय जाधव आणि गटशिक्षणाधिकारी संपत गावडे यांचे सहकार्य लाभले . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी जाधव , मुख्याध्यापिका कविता जाधव , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जीवन राऊत , स्वप्निल शिंदे , दत्तात्रय घोलप, शमशाद इनामदार , उपशिक्षिका विजया दगडे , लता लोणकर , सुनीता पवार , राणी ताकवले आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, गणवेश यासारख्या योजनेबरोबरच मोफत बूट-सॉक्स मिळाल्यामुळे विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला.