माझं कवितांच गावं जकातवाडी संस्था सातारा गोखळी गावात शाखेच्या शुभारंभात कविसंमेलन रंगले 

माझा जिल्हा

प्रतिनिधी

गोखळी -सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका गोखळी गावात माझं कवितांचा गाव जकातवाडी येथील संस्थेच्या गाव तेथे संस्था या उपक्रमातील गोखळी शाखेचा शुभारंभ संपन्न झाला.

मुख्य संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य प्रल्हाद पारटे उपाध्यक्ष विश्वास नेरकर कार्याध्यक्षा सुषमा आलेकरी सचिव वसुंधरा निकम यांच्या उपस्थितीत होते

कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ स्वागताध्यक्ष नंदकुमार गावडे प्रमुख पाहुणे रमेश आढाव ताराचंद आवळे विकास शिंदे लीना पोटे या मान्यवरांच्या शुभहस्ते समई प्रज्वलित करण्यात आली याप्रसंगी ई कवितांचा अंक प्रकाशित करण्यात आले

     बजरंग गावडे मार्गदर्शन करताना म्हणाले वाचन संस्कृती वाढली पाहिजे गावोगावी अशा संस्था समाज विचारांची देवाणघेवाण करतात ही गोष्ट अभिमानाची आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य प्रल्हाद पारटे म्हणाले प्रथम आपण घरोघरी मराठी बोलले पाहिजे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल वाचन मनन चिंतन संस्कृती वाढली तरच गावोगावी अशी साहित्य सेवा करणारी मंडळी भेटतात जनमाणसात गेले तरच कवितेचे महत्त्व वाढेल समाज घडविण्यासाठी लेखन पाहिजे केले उद्देश साहित्य प्रेरणा मिळावी तर आपली उन्नती होईल

    असं काहीतरी करू गड्या

घडतीन आपल्या सात पिढ्या

कविता ऐकून वाचूनआपण कवी व्हा जोपर्यंत माझ कवितांचं गावं जकातवाडी राजधानी सातारा होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असा पण मी केला आहे असे प्रतिपादन प्रकाश पारटे यांनी केले

      अनिकेत पोळके म्हणाले भेदाभेदी होई इथं मुलीच्या या जातीला

 आजी बाई वाचव आता तुझ्याच गं नातीला

      अध्यक्षिय भाषणात रविंद्र बेडकीहाळ म्हणाले अध्यात्माची किनार असली तर साहित्य वाटचाल पुढे जाईल अध्यात्म जागृत ठेवले तरच आपली प्रगती नक्कीच होईल गाव आम्ही आहोत पण सातारा राजधानी व्हावी प्राचीन मराठी आहे मराठी भाषा सोडून कोणतीही भाषा प्राचीन नाही रानकवी जगदीप वनशिव विलास वरे वसंत सकुंडे हे घडलेले नामवंत कविवर्य असून हे सगळे जमिनीवर आहेत पक्ष नको अक्षर पक्षी व्हा पत्रकार बांधवांना संसदभवन विधानसभाचे दरवाजे बंद केले आहे देशाचा तिसरा स्तंभ दिशाहीन झाला आहे साहित्याला दिशा पाठबळ देणारेच हवालदिल झालेले दिसतात साहित्यिक माणसे सैरभैर नाही झाले पाहिजेत संस्था वाढावी ही अपेक्षा करतो असा आशावाद व्यक्त केला या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन शाहीर कवी प्रमोद जगताप यांनी बहारदार दमदार आवाजात शीघ्रशैलीत पार पाडले.

    दुसऱ्या सत्रात कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते या कविसंमेलनाध्यक्ष महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी भूषविले असून प्रमुख पाहुणे लीना पोटे सुषमा आलेकरी वसुंधरा निकम ह.भ.प शुभांगी जाधव, स्नेहल काळे, प्रिया जगताप, प्रल्हाद पारटे यांच्या उपस्थितांच्या साक्षीने फलटण तालुका कार्यकारिणी जाहीर केली नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले

पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रमोद जगताप उपाध्यक्ष गुड्डाराज नामदास उपाध्यक्ष ॲड आकाश आढाव सचिव अविनाश चव्हाण

संचालक प्रकाश सकुंडे ज.तु.गार्डे भाग्यश्री खुटाळे स्नेहल काळे राजेश माने अस्मिता खोपडे सुशिल गायकवाड दामिनी ठिगळे .

             कविसंमेलनाची सुरूवात झाली बालकवी अतिष झेंडे प्रभूची लेकरे रचना सादर केली ज्येष्ठ साहित्यिक विलास वरे यांनी आपल्या कवणातून कवी राजा ला मुजरा घातला असून संस्कृतीचा ठेवा जपणारी रचना सादर करून रसिकांची मने जिंकली अस्मिता खोपडे मदनिका गोडवेलीची महती सांगणारी रचना होती प्रकाश सकुंडे लक्ष्मी रचना सादर केली अन् हास्यफवारे उडाले उचल्या कवी अमोल भोसले यांनी कुलगुरू डॉ शंकरराव खरात सरांची कविता तोंड पाठ असणारी रचना सादर केली अन् हास्य कल्लोळ माजला वसुंधरा निकम साताऱ्याची महती सांगणारी रचना सादर केली आनंदा भारमल यांनी गझल सादर करून रसिकांना वेगळीच मेजवानी दिली मृदूल आवाजात सादर केली शुभांगी जाधव यांनी अखेरचे गाव माझं गोड आवाजात सादर केली अन् रसिकांच्या मनात ठाव घेत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले अविनाश चव्हाण तुझा वेडा तुझा वेडा तुझ्यासाठी झालो वेडा

मंदिर मस्जिद मध्ये देव नाही

प्रेयसीला देव मानणारा च खरा कवी असतो अन् तो खरा प्रेमवेडा च् असतो ठामपणे मांडले संतोष झगडे लावणी गझल विनोद सादर केल्या भीमसेन उबाळे आये मला बाबासाहेबां सारखं व्हायचं प्रबोधन क्रांतीकारी व मार्मिक भाष्य करणारी रचना मांडली वसंत स़कुंडे वय झालं तरी लग्न होतं नाही किती दिस कळ काढायची अशी विनोदी रचना सादर केली हास्य कल्लोळ झाला लीना पोटे गोखळी गावाची महती शीघ्र रचनेतून मा़ंडली स्नेहल काळे जीवनाचा बोध सुभाष वाघमारे पुढारी रचना सादर केली दत्तायत्र भोसले पहाडी आवाजात परिवर्तनवादी कविता श्रावणी भोसले कोकण दर्शन घडविले आबासाहेब मदने मनातील खदखद मांडली राजकारण व्यसन यावर चपराक ताशेरे ओढले

 अध्यक्षिय भाषणात रानकवी जगदीप वनशिव म्हणाले कविता जगली पाहिजे कविता लिहून ती आत्मसात झाली तर साहित्य सेवा घडते एकतरी कविता पाठ असावी समाज प्रबोधन क्रांतीकारक विचार मांडणे ही काळाची गरज आहे कवितेची राजधानी होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून तन मन धनाने पुढाकार घेतला तरच प्रकाश पारटे सरांचे नक्कीच साकार होईल जगा पण नवीन विचार संतांच्या विचार ते आजपर्यंत रूजला आहे तसाच कवितेचा इतिहास घडला पाहिजे कविता वास्तववादी मनाला रूंजी घालते कविता मनोरंजन करणारी नसावी ती डोळ्यात अंजन घालणारी पाहिजे असे प्रतिपादन केले

         कविसंमेलन पार पडत असताना राजाराम अष्टेकर जेल्वर्स बारामती यांच्या वतीने उत्कृष्ट तीन कवींना चोवीस कॅरेट लक्ष्मीची प्रतिमा असणारी बक्षिसे देण्यात आली प्रथम वसंत सकुंडे (आसू) व्दितीय शुभांगी जाधव (सोमेश्वर) तृतीय सुभाष वाघमारे (वालचंदनगर) हे बक्षिसांचा उत्तर देताना म्हणाले कवीच्या शब्दांना सोन्याचे दिवस आले या सर्व बक्षिस पात्र कवीनां कविसंमेलनाचे अध्यक्ष रानकवी जगदीप वनशिव यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण सोहळा झाला

    अशा या सुंदर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन शब्दसम्राज्ञी जयश्री माजगावकर यांनी बहारदार दमदार आवाजात शीघ्रशैलीत चारोळ्या चुटके शेरोशायरी विनोद सांगता मैफिलीला रंगत वाढवली

गोखळी गावात कवितांच्या गावाचा जागर यज्ञ संपन्न झाला

सरतेशेवटी जेवणाची मेजवाणी दिली. तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे, पोलीस पाटील विकास शिंदे माजी उपसरपंच अभिजित जगताप यांनी सांऊड सिस्टीम, स्वागत साहित्य व अल्पोहार देऊन संयोजकाची भूमिका आनंदाने पार पाडली.