वीर धरण विसर्ग बाबत महत्त्वाची सूचना.

Uncategorized

आज दिनांक २५/०८/२०२४ रोजी वीर धरण १००% भरलेले असून पाणी पातळी मध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.नीरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे .तसेच भाटघर धरण ,निरा देवघर व गुंजवणी धरणातून सांडव्यावरून तसेच विद्युत गृहाद्वारे विसर्गात वाढ झाली आहे तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊसाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक २५/०८/२०२४ रोजी रात्री ८.४५ वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्याच्या अतीवाहका द्वारे ३५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेऊन निरा उजव्या कालव्याच्या अतीवाहकाद्वारे १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ६१९२३ क्यसेक्स विसर्गामध्ये वाढ करून ६९९९९क्यसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात येत आहे.आता *निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग ७१३४९ क्युसेक्स असणार आहे.*
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.याद्वारे विनंती करण्यात येते कि,नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी.

*-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग,फलटण,जिल्हा सातारा*