प्रतिनिधी फिरोज भालदार
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३३ वी जयंती वडगाव निंबाळकर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. राजे उमाजी नाईक यांच्या २३३ व्या जयंती उत्साह सोहळ्यानिमित्त वडगाव निंबाळकर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी भारताचे प्रथम क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांवरती व्याख्यान श्री सागर चव्हाण सुप्रसिद्ध व्याख्याते पुरंदर यांनी केले व राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर यांच्यावतीने गुणगौरव पुरस्काराचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता .
शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी भिवंडी ते वडगाव निंबाळकर क्रांतीज्योत आणण्यात आली. वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने क्रांतिज्योतीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी पारंपारिक पद्धतीने आकर्षक रथ व रोषणाई करून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व महिलांनी मोठा सहभाग घेतला होता.