प्रतिनिधी –
पिंपळाच्या पानापासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शासन स्तरावरील आनंदायी शनिवार या अंतर्गत विविध उपक्रम घेतले जातात त्याचाच भाग म्हणून गणेशोत्सव कालावधीत शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आनंद निर्मितीसाठी पिंपळाच्या पानापासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक शाळेतील उपशिक्षिका सौ मनिषा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्याकडून पिंपळाच्या पानाच्या साह्याने गणपती कसा बनवायचा याची कृती करून दाखवली . शंभर विद्यार्थ्यांच्या कडून गणपती प्रत्यक्ष बनवून घेतला .सदरच्या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवननाथ सर्जे उपशिक्षिका सौ . सुनीता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अडचण येईल त्या ठिकाणी मदत केली . त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करून आनंददायी शनिवार या उपक्रमाचा आनंद घेतला . काही विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने पानांचा प्रात्यक्षिकाप्रमाणे मांडणी केल्यामुळे हुबेहूब गणपती तयार झाल्याचे दिसून आले . काही विद्यार्थ्यांनी आकर्षक रंग दिले . आपण बनवलेला गणपती शिक्षकांना दाखवण्याची चढाओढ मुलांच्या मध्ये दिसत होती .
शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे श्री संजय नाईकडे यांची उपक्रमशिल शाळा मुख्याध्यापक आढावा बैठक जिल्ह्यातील शाळांची पार पडली . सदर सभेत कांबळेश्वर शाळेने सहभाग घेतला होता . शिक्षणाधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शाळेमध्ये मल्लखांब विद्या प्रात्यक्षिके तज्ञ मार्गदर्शक श्री विनोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तर कोडींग , जर्मन भाषा याचे शाळेमधील शिक्षक प्रशिक्षण घेत असून शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा उपक्रमाबरोबर सहशालेय उपक्रम राबवण्याचे काम शाळेतील सर्व शिक्षक करत आहेत . विद्यार्थ्यांना चालना देणेसाठी गेल्या ३ वर्षापासून शाळेत बालसंस्कार वर्ग , योगा, होमोनियम वादन गायन असे विविध उपक्रम शाळेत होत असून कौशल्य निर्मिती, व्यवसायपूरक उपक्रम भेटी वर भर दिला जाणार असल्याचा मानस मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी व्यक्त केला .आनंदायी शनिवार अंतर्गत आगळावेगळा उपक्रम राबवल्याने सरपंच सौ .मंदाकिनी कानडे उपसरपंच श्री गिरीश खलाटे शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सौ दिपाली खलाटे पालक ग्रामस्थ यांनी विद्यार्थी ,शिक्षकांचे कौतुक केले .