• Home
  • क्राईम
  • माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सूत्रधार अटकेत
Image

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सूत्रधार अटकेत

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली. बेल्हेकरला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून, दाेन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.

आंदेकर यांचा एक सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाला. आंदेकर यांची बहीण संजीवनी, मेहुणे प्रकाश, जयंत, गणेश, काेमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. आंदेकर यांचा खून झाल्यानंतर नाना पेठेतील समाधान चौकात राहणारा प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३) पसार झाला होता. बेल्हेकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह चार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तो नाना पेठेतील सूरज ठोंबरे टोळीतील आहे. ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड मित्र आहेत. वर्षभरापूर्वी झाालेल्या निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता. आरोपी कोमकर, गायकवाड आणि बेल्हेकर यांनी आंदेकरांचा खून करण्यासाठी कट रचल्याची माहिती तपासात उघड झाली.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कोमकर आणि गायकवाड यांची बैठक झाली. बेल्हेकर याने गायकवाड आणि कोमकर यांची बैठक घडवून आणली होती. आरोपी गणेश कोमकर आणि बेल्हेकर समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात होते. याबाबतचे तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. खूनाच्या कटात बेल्हेकरने महत्त्वाची भूमिका बजावली, असे पोलिसांनी सांगितले.

आंदेकर यांचे मेहुणे गणेश याच्यावर खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळवून देणे, तसेच पैसे उभे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कोमकर, बेल्हेकर, गायकवाड, दहिभाते यांनी आंदेकरांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026