वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेच्या संमतीशिवाय वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून, याबाबत कोणाला सांगितल्यास पती व मुलाला जीवे मारण्याची तसेच शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी अक्षय अजित तावरे (रा. थोपटेवाडी, को-हाळे बु., ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध बीएनएस कलम 64(2)(m), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
दि. 02/04/2026 रोजी रात्री 10.45 वा. पासून ते दि. 04/11/2026 रोजी सकाळी 09.45 वा. पर्यंतच्या कालावधीत मौजे थोपटेवाडी, को-हाळे बु. येथील दोन वेगवेगळ्या घरांमध्ये आरोपीने फिर्यादी महिलेच्या संमतीशिवाय वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच सदर प्रकाराबाबत पतीला सांगितल्यास पती व मुलाला जीवे मारण्याची आणि शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुलाणी करीत आहेत.
