• Home
  • माझा जिल्हा
  • कामाच्या बाबतीत दुसरा कुणी आमदार आपला हात धरू शकत नाही – अजित पवार
Image

कामाच्या बाबतीत दुसरा कुणी आमदार आपला हात धरू शकत नाही – अजित पवार

सोमेश्वरनगर – प्रतिनिधी
मी ही दहा वाजेपर्यंत झोपु शकतो. पण मी कामाचा माणूस आहे मी जे बोलतो ते करूनच दाखवतो. काही जण मात्र फक्त निवडणुकीपुरते येतील मात्र तालुक्याचा विकास असाच चालू ठेवायचा असेल तर आपल्या विचारांचा आमदार निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले.
होळ येथील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की राज्यातील बहिणींना सक्षम करायचे आहे. शेतकऱ्यांना आधार द्यायचा आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये सरकार खर्च करत आहे. मात्र या योजना भविष्यातही चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. मी फक्त विनंती करू शकतो. मत कुणाला द्यायचे तो अधिकार तुम्हाला आहे.
गेली अनेक वर्षे आपण सरकारमधे होतो मात्र या टर्म मधे सर्वात जास्त विकासकामे करू शकलो याचा आनंद आहे. बारामती तालुक्यात अनेक योजना राबवता आल्या. आठ हजार कोटींची कामे करता आली.
मी सेक्युलर माणूस आहे. सर्व धर्मांना सोबत ठेवून आपण विकास करत आहोत. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत. घटनेला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी शांत बसेन का हे तुमचेच सरकार आहे. समाजातील कुठलाही घटक वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेत आहोत. केंद्रातील सरकार आपल्या विचाराचे आहे तेव्हा बारामतीचा आमदार ही आपल्या विचाराचा निवडून येईल यासाठी सर्वांनी झटून काम करा असा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी युवा नेते जय पवार, पक्ष निरीक्षक सुरेश पालवे, संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, किरण गुजर, विश्वास देवकाते, विक्रम भोसले, पोपट गावडे, सतीश काकडे, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, नानासाहेब मदने, सचिन सातव उपस्थित होते.
…….
चौकट – निदान माझ्यासाठी तरी गटतट विसरा- अजितदादा…
गेली तीस वर्षे मी तुमच्यासाठी झटतोय. पहाटेपासून कामाला सुरुवात करतोय. पक्षात गटतट आहेत. मात्र मागे काय झाले ते विसरा. एकमेकांवर गैरविश्वास ठेवू नका. शेवटच्या मतदारपर्यंत पोहचा. किमान माझ्यासाठी तरी गटतट विसरा असे आवाहन अजितदादांनी कार्यकर्त्यांना केले.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026