सौहार्द व बंधुभावनेचे दैवी दृश्य दर्शविणाऱ्या ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

माझा जिल्हा

प्रतिनिधी

पुण्यासह महाराष्ट्रातून सुमारे एक लाख भक्तगण उपस्थित  जीवनात परमात्म्याला धारण केल्याने होतो मानवी गुणांचा विस्तार- निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

 वैश्विक स्तरावरच्या ७७व्या तीन दिवसीय वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ शनिवारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेच्या नावे दिलेल्या दिव्य संदेशाद्वारे झाला असून या संत समागमामध्ये देशविदेशातून लाखो भाविक-भक्तगण सहभागी झाले आहेत. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या संत समागमामध्ये सुमारे एक लाख भाविक आलेले आहेत.

मानवतेच्या नावे संदेश

संत समागमाच्या शुभारंभ प्रसंगी विशाल सत्संगच्या रूपात एकत्रित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना प्रतिपादन केले, की परमात्मा जाणण्यायोग्य आहे आणि याला जाणून जेव्हा आपण जीवनात धारण करतो तेव्हा सहजपणे आमच्या जीवनात मानवी गुणांचा विस्तार होऊ लागतो.

सतगुरु माताजींनी पुढे सांगितले, की समागमाचा मुख्य विषय ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ ही अंत:करणातून बाहेर पडून परमात्म्याकडे जाणारी एक दिव्य यात्रा आहे. बहुधा मनातील तनाव तसेच मन आणि बुद्धीच्या समतोलाची बाब समोर येते. खरं तर मन आणि बुद्धी सोबतच आहेत; परंतु कधी कधी मनाची इच्छा काही वेगळी असते आणि बुद्धी काही वेगळाच विचार करत असते. तथापि, जेव्हा आपण या परमात्म्याशी नाते जोडतो तेव्हा मनामध्ये स्थिरता येते, आपुलकीचा भाव उत्पन्न होतो आणि मन विशाल होते.

 *दिव्य युगुलाचे भव्य स्वागत*

समागम स्थळावर सतगुरु माताजी व निरंकारी राजपिताजी या दिव्य युगुलाचे आगमन होताच संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांनी व अन्य अधिकाऱ्यांनी पुष्पमाला व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यानंतर मुख्य मंचापर्यंत त्यांचे स्वागत एका भव्य शोभायात्रेच्या रूपात करण्यात आले. यावेळी निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ  म्युझिक ॲन्ड आर्टसच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नृत्य व संगीताच्या माध्यमातून दिव्य युगुलाचे अभिनंदन केले.

 *ईश्वराशी प्रेम हाच सर्वांशी प्रेमाचा सरळ मार्ग*

पहिल्या दिवसाच्या सत्संग समारोहाच्या शेवटी लाखोंच्या संख्येने उपस्थित मानव परिवाराला आपल्या अमृतवाणीने कृतार्थ करत सतगुरु माताजी म्हणाल्या, की जगामध्ये विचरण करत असताना जेव्हा आपण आपल्या सीमित परीघानुसार विचार करतो तेव्हा अगदी थोड्या लोकांना ओळखत असतो; परंतु ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशात ईश्वराशी आपण प्रेमाचे नाते जोडतो तेव्हा प्रत्येकामध्ये ईश्वराचे रूप पाहून सर्वांशी प्रेम करु लागतो. सकळांशी प्रेम करण्याचा हाच सरळ मार्ग होय.

सतगुरु माताजी म्हणाल्या, की आपल्या सामाजिक अथवा कौटुंबिक अशा सर्व कार्यांमध्ये परमात्म्याला सहभागी करुन घेतल्याने सर्वांच्या प्रति आमच्या मनामध्ये दया, करुणेचे भाव उत्पन्न होतात आणि आपण नि:स्वार्थ भावनेने मानवमात्राच्या सेवेमध्ये समर्पित होऊ लागतो.

 *सेवादल रॅली*

 समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ रविवारी सकाळी एका आकर्षक सेवादल रॅलीने झाला. या रॅलीमध्ये देशविदेशातील हजारो सेवादल स्वयंसेवक बंधु-भगिनी सहभागी झाले. या रॅलीमध्ये सेवादल स्वयंसेवकांनी शारीरिक कवायती व्यतिरिक्त मानवी मनोरे, विविध खेळ तसेच मिशनच्या शिकवणूकीवर आधारित उद्बोधक लघुनाटिका सादर केल्या.

सेवादल रॅलीमध्ये उपस्थित स्वयंसेवकांना आपले आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माताजी म्हणाल्या, की सेवेची भावना अत्यंत पवित्र असते. त्यामध्ये कोणतीही कामना नसते तर कृतज्ञतेचा भाव साठलेला असतो. ज्या कार्यासाठी निराकार प्रभूने आपली निवड केली आहे, जी जबाबदारी सोपवलेली आहे ती पूर्ण सजगपणे निभावली जावी हाच भाव असतो.

शेवटी, सतगुरु माताजींनी सांगितले, की आपल्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून परिवाराचा समतोल साधत आपण सेवांमध्ये आपले योगदान देत जावे. सेवादारांना निरंतर भक्तीभावाने सेवा करत राहण्याचा आशीर्वादही सतगुरु माताजींनी प्रदान केला.