बारामती! वडगाव निंबाळकर मधील बंगला झोपडपट्टी येथे अंगणवाडीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर मधील बंगला झोपडपट्टी येथील अंगणवाडी मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . यावेळी वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथील ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अंगणवाडी मधील चिमुकल्यांनी स्त्रीमुक्ती दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वेगवेगळ्या वेशभुषा प्रधान केले होते . यावेळी अंगणवाडी शिक्षिका मयुरी साळवे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली . यावेळी ग्रामस्थ महिला , शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.