• Home
  • राजकीय
  • नवख्या अभिजीत काकडे यांच्या गटाने दिग्गज राजकीय नेत्यांच्या गटाला केले चारी मुड्या चितपट.
Image

नवख्या अभिजीत काकडे यांच्या गटाने दिग्गज राजकीय नेत्यांच्या गटाला केले चारी मुड्या चितपट.

संपादक- मधुकर बनसोडे.

दोन दिवसांपूर्वी गडदरवाडी ग्रामपंचायत साठी मतदान झाले आज सकाळी साधारणपणे साडेअकरा वाजता निकाल जाहीर झाला या निकालामध्ये सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. गरदडवाडी ग्रामपंचायत साठी राष्ट्रवादी पुरस्कृत दोन पॅनल तर भाजप पुरस्कृत एक पॅनल अशी लढत होती. अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून गडदरवाढी ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र अभिजीत काकडे यांचं जनसामान्य माणसातील आकर्षण, साधा स्वभाव, विरोधक असला तरी त्याचं काम करण्यासाठी असणारी आपुलकी यामुळेच अभिजित काकडे यांच्या गटाला हा दणदणीत विजय प्राप्त झाला असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या गटातील चार दिग्गज नेते. तर दुसरीकडे अनुभवानी नवीन असणारा मात्र जनसामान्य माणसांच्या हाकेला धावून जाणारा अभिजीत काकडे यांच्या गटाने 8:0 करून दणदणीत विजय मिळवला.

Releated Posts

केंद्रात, राज्यात ‘ हिरो ‘ ; बारामतीत मात्र ‘ झिरो’….

प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त.. पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या व जवळपास विरोधी…

ByBymnewsmarathi Feb 11, 2026

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा…

ByBymnewsmarathi Jan 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा – प्रकृती कारणास्तव पदत्याग

प्रतिनिधी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2025