• Home
  • माझा जिल्हा
  • बारामतीत अनधिकृत बॅनर, फ्लेक्सला आळा; नगरपरिषदेचा ठराव जाहीर
Image

बारामतीत अनधिकृत बॅनर, फ्लेक्सला आळा; नगरपरिषदेचा ठराव जाहीर

प्रतिनिधी.

बारामती : शहरातील वाढत्या बॅनर, फ्लेक्स व अनधिकृत जाहिरातींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, वृक्ष लागवडीचे व स्ट्रीट फर्निचरचे नुकसान होणे तसेच शहराचे विद्रुपीकरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेकडून कडक पाऊले उचलण्यात आली आहेत.

महाराष्ट्र शासन निर्णय क्र. पीएमसी-३०१०/ प्र.क्र. ३९४ (भाग-२)/नवि-२२ दि.२२ जून २०२३ नुसार “आकाश-चिन्हे व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण मार्गदर्शक तत्वे २०२३” प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासकीय ठराव क्र. ३४६ दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी मंजूर करून बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्वत्र बॅनर, फ्लेक्स, जाहिराती व स्कायसाईन लावण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या निवेदनानुसार, येथून पुढे कोणतेही बॅनर, फ्लेक्स, जाहिराती अथवा आकाशचिन्हे विनापरवानगी लावल्यास ते तात्काळ जप्त केले जाणार असून संबंधित व्यक्ती, संस्था, तसेच बॅनर लावण्यात सहभागी असणाऱ्या मंडप कॉन्ट्रॅक्टरवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, १९९५ व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले असून, “अनधिकृत बॅनर लावून शहराचे सौंदर्य विद्रुप करू नये. शहर स्वच्छ, सुंदर, हरित व अपघातमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026