आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात बिबट्या दिसल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. यासंदर्भात आम्ही सर्व नागरिक आणि प्रशासनाला हे स्पष्ट करू इच्छितो की, सदर बातमी पूर्णपणे चुकीची, निराधार आणि वस्तुस्थितीला धरून नाही.
सदर माहिती ‘एम न्यूज मराठी’कडून पूर्णपणे अनावधानाने आणि तांत्रिक चुकीमुळे प्रसिद्ध झाली. आमचा कोणताही वाईट हेतू किंवा समाजात भीती निर्माण करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. तांत्रिक अनावधानाने ही माहिती सार्वजनिक झाली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला.
बारामती वन विभागाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, परिसरात कोणत्याही बिबट्याचा वावर नाही. आमच्या या चुकीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि वन विभाग, पोलीस प्रशासन यांच्या कामात जो व्यत्यय आला, त्याबद्दल ‘एम न्यूज मराठी’ वन प्रशासन, पोलीस विभाग आणि सर्व नागरिकांची अंत:करणपूर्वक आणि बिनशर्त माफी मागत आहे.
आम्ही सदर बातमी पोर्टल आणि सोशल मीडियावरून तातडीने हटवली आहे. तरी नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये आणि ही चुकीची माहिती कुठेही शेअर करू नये, अशी नम्र विनंती आहे. भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही आणि अधिकृत खात्री केल्याशिवाय कोणतीही माहिती प्रसिद्ध केली जाणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.
















