• Home
  • माझा जिल्हा
  • खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने
Image

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात

खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी खंडेश्वरी माता मंदिर परिसरात ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गावातील सर्व मान्यवर, तरुण मंडळे, महिला बचतगट प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले की, यावर्षीची यात्रा पारंपरिक उत्साहाऐवजी साध्या आणि मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात येईल. सालाबादप्रमाणे आयोजित होणारे तमाशा, कुस्त्यांचे फड, दारूगोळा (फटाक्यांची आतषबाजी), तसेच आकर्षक विद्युत रोषणाई यांसारखे करमणुकीचे सर्व कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत.

स्व. अजितदादा पवार यांच्या अलीकडील विमान अपघातातील दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शोकभावनेतून हा निर्णय घेतल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. गावाच्या एकजुटीचा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठेवत अनावश्यक खर्च टाळून धार्मिक विधींवर भर देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

तथापि, देवीचे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. रामनवमी, पालखी सोहळा, लळीत, नैवेद्य नारळ अर्पण तसेच हनुमान जन्मोत्सव हे सर्व धार्मिक विधी साध्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध वातावरणात आयोजित केले जाणार आहेत. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

यात्रा समितीने स्पष्ट केले की, गावातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक परंपरा अबाधित ठेवत साधेपणातून श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय जाहीरपणे कळविण्यात येत असून सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Releated Posts

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026