Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…
Image

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी

(लेखन- सोपान कुचेकर)

गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे…

पहाटेपासून सुरू होणारी ही लग्नाची धांदल रात्री उशिरापर्यंत सुरूच असते… नवरदेव आणि नवरी सजलेल्या गाडीत बसलेले असतात… तर दुसरीकडे अक्षरशः कडक उन्हात वाजंत्री पायी चालताना दिसतात…

सकाळचे नऊ-साडेनऊ वाजले तरी उन्हाचा तडाखा एवढा प्रखर असतो की रस्त्यावर चालणंही कठीण होतं… मात्र तरीही ढोल-ताशा, सनई-चौघडा आणि गाण्यांच्या तालावर वरात उत्साहात पुढे सरकत असते…

“गणाला माझ्या घेऊन ये…” अशा गाण्यांवर काही कलाकार मनमोकळेपणाने गाताना दिसतात… पण या आनंदामागे अनेक कामगारांचे कष्ट लपलेले आहेत… फोटोग्राफर सकाळपासून नवरी-नवरदेवांच्या मागे पुढे करत प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असतो…

कडक उन्हात घामाने अंग चिंब झालं तरी त्याची धावपळ थांबत नाही… तर वाजंत्री वाजवणारे कलाकारही उन्हाची पर्वा न करता आपल्या कलेत मग्न होऊन वातावरण रंगवत असतात…

घामाच्या धारा वाहत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र कायम दिसून येतो… मात्र अनेक वेळा या मेहनती कलाकारांना साधं पाणी विचारायलाही काही जण विसरतात…

उन्हाळ्याच्या या प्रखर तापमानात त्यांनाही थोडी माणुसकी आणि आधाराची गरज असते… लग्न समारंभ आनंदाचा असला तरी या आनंदामागे अनेक हात राबत असतात…

त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला आणि सन्मान मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे… उन्हाळ्याच्या या लग्नसराईत आनंदासोबत माणुसकीचंही दर्शन घडणं गरजेचं आहे…

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026