• Home
  • ताज्या बातम्या
  • हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान
Image

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन प्रेरणा आणि दिव्य आशीर्वादाने संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने ५ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त भारतातील १८ प्रमुख पर्वतीय व पर्यटनस्थळांवर वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘Beat Plastic Pollution’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनापुरता मर्यादित नसून “सेवा, सुमिरण आणि सद्भाव” या तत्त्वांद्वारे निसर्गसंरक्षणाची एक आध्यात्मिक साधना म्हणून साकारला जात आहे.
या अभियानात स्वयंसेवक, सेवादल सदस्य, श्रद्धाळू आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्त सहभाग घेऊन वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पथनाट्ये आणि विविध जनजागृती उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतील. पर्यावरणविषयक संदेश असलेले फलक, मानवी साखळी आणि जनसंपर्क उपक्रमांद्वारे “निसर्गाची सेवा हीच प्रभूसेवा” हा संदेश जनमानसात रुजविण्यात येईल.
महाराष्ट्रातील खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा आणि सोमेश्वर यांसह देशभरातील १८ महत्त्वपूर्ण स्थळांवर हे अभियान एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. संत निरंकारी मिशनचे पुणे झोनल प्रभारी आदरणीय श्री. अशोक अहुजा यांनी माहिती देताना सांगितले की, संत निरंकारी मिशन २०१४ पासून संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार ‘जागतिक पर्यावरण दिन’ सेवा, जनजागृती आणि लोककल्याणाच्या माध्यमातून सातत्याने साजरा करीत आहे. या शृंखलेचाच भाग म्हणून यंदाही देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले असून ही सर्व स्थळे “हरित जागरूकता, स्वच्छता साधना आणि प्लास्टिक मुक्त भारत” यांची प्रेरणास्थाने ठरतील.
“निसर्गाची सेवा हीच प्रभूसेवा” या भावनेतून राबविण्यात येणारे हे अभियान स्वच्छ, सुरक्षित आणि हरित भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे.

Releated Posts

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे बारामती, दि. ११: श्री संत तुकाराम महाराज पालखीचे…

ByBymnewsmarathi Jul 11, 2026

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा ; वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुकीत बदल.

प्रतिनिधी – मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026

अश्लील मेसेज, ब्लॅकमेल आणि फेक इन्स्टाग्राम; कारंजे येथील युवकांवर पॉक्सोसह गंभीर गुन्हा दाखल.

वडगाव निंबाळकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलेचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करणे,…

ByBymnewsmarathi Jul 7, 2026