Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल
Image

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक – अक्षय थोरात

बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 12 म्हशींची रेडके आणि एक बोलेरो मॅक्सीट्रक पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 2 लाख 98 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाहुणेवाडी येथील ओम साई लॉन्ससमोर बारामती-फलटण रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. बारामतीकडून फलटणच्या दिशेने जाणाऱ्या MH-16 CC-2049 क्रमांकाच्या बोलेरो मॅक्सीट्रक पिकअपमधून म्हशींची रेडके वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनात अंदाजे 7 ते 8 महिन्यांच्या वयाची 12 म्हसाणा जातीची रेडके अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच जनावरांच्या सुखसोयीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
याशिवाय जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना, वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे तसेच प्रथमोपचार पेटी वाहनात उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे जनावरांना क्रूर वागणूक दिल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी घोडेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथील आसिफ इकबाल पठाण (वय 27) याच्याविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1)(ड), मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 66(1), 192, प्राण्यांच्या वाहतूक नियमांतील विविध तरतुदी तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वैभव सुनील थोरात यांनी फिर्याद दिली असून माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 156/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026