मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 17 June 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करत पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी दिला सामाजिक संदेश

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 17, 2026 1 मिनिट वाचन 8,541 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

बारामती : आजच्या काळात वाढदिवस मोठ्या गाजावाजात, खर्चिक पद्धतीने साजरे करण्याची प्रथा वाढत असताना करंजे पूल दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस वेगळ्या आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या पद्धतीने साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस यशवंतराव मोरे-पाटील आश्रमशाळा, मुर्टी-मोढवे, ता. बारामती, जि. पुणे येथे साजरा केला. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले तसेच वही, पेन व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या वाढदिवसाचा खरा उत्सव ठरला.

विशेष म्हणजे, परिसरात गुन्हेगारीविरोधातील कठोर भूमिका, अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राहुल साबळे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामाची चर्चा परिसरात सातत्याने होत असते.

कर्तव्य बजावत असताना समाजाप्रती असलेली बांधिलकीही त्यांनी या उपक्रमातून अधोरेखित केली. वाढदिवसाचा अनावश्यक दिखावा टाळून समाजातील वंचित व गरीब विद्यार्थ्यांसमवेत आनंद वाटून घेण्याचा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

या प्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“आनंद साजरा करताना समाजातील गरजू घटकांनाही त्यात सहभागी करून घेतले पाहिजे,” हा संदेश राहुल साबळे यांनी आपल्या कृतीतून दिला असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख