लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी :
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 150/2026 अन्वये बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम कलम 4, 6, 8, 12 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2) व 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुरज विनायक भोसले (रा. तरडोली, ता. बारामती, जि. पुणे) याला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) जीवन मोहिते प्रभारी अधिकारी वडगाव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करीत आहेत.
