मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Saturday, 17 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित

mnewsmarathi 02 Sep 2026 1 मिनिट वाचन 4,351 वाचन

प्रतिनिधी

पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट आणि निष्ठावान योगदान दिल्याबद्दल एम.सी.एन न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष बारामतीचे शहरप्रमुख कृष्णमूर्ती पांडुरंग जगताप यांना प्रतिष्ठित ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ गौरवण्यात आले आहे. एम.सी.एन न्यूज मराठीच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव जामोद येथील सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिरच्या सभागृहात एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.

​या सोहळ्याचे उद्घाटन जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी श्री. शैलेश काळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोदचे तहसीलदार श्री. पवन पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, एम.सी.एन न्यूज मराठीचे मुख्य संपादक श्री. शामभाऊ तायडे आणि संपादक श्री. राजुभाऊ वाढे उपस्थित होते. तसेच ॲड. संदीप उगले, श्री. निलेश काळे, श्री. रमेश जाधव, श्री. अमोल चौधरी, डॉ. वाकेकर, श्री. संदीप देशमुख, डॉ. किशोर केला आणि श्री. सचिन तायडे यांसारख्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची विशेष उपस्थिती लाभली.

​कृष्णमूर्ती जगताप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासोबतच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रगण्य भूमिका बजावली आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू व सर्वसामान्य रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या याच बहुआयामी आणि निष्कलंक सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

​या भव्य सोहळ्याला महाराष्ट्र राज्यातील एम.सी.एन न्यूज मराठीचे सर्व प्रतिनिधी, पत्रकार बंधू, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने वाचकवर्ग उपस्थित होता. कृष्णमूर्ती जगताप यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल आणि उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या सन्मानामुळे बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या पत्रकारिता वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi