मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 6 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

वडगाव निंबाळकर व स्थानीक गुन्हे आन्वेशन शाखा पुणे ग्रामीणचे पोलीसांनी जबरी चोरी करणारे टोळीचा पर्दापाश करून एकूण २,३०,०००/- रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल केला जप्त.

mnewsmarathi 06 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,350 वाचन

प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे लाटे ता. बारामती जि. पुणे गावचे हद्दीत जबरी चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झालेने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. १८०/२०२६ बी.एन.एस. कलम ३११,३३१ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर माननीय वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तात्काळ पथक नेमुन पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना करण्यात आले. सदर गुन्हयातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहीतीच्या आधारे मौजे कांबळेश्वर ता. बारामती जि. पुणे गावचे हद्दीतील शोध घेतला तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. १८३/२०२६ बी.एन.एस. ३०३(२) या गुन्हयातील निष्पन्न आरोपीचे तसेच इतर संशयीत आरोपीतांचे घराची मौजे कांबळेश्वर ता. बारामती जि. पुणे येथे घरझडती घेतली असता त्यांचे घरात घरफोडी करण्यासाठी वापरलेले साहीत्य मिळुन आलेने सदर गुन्हयातील आरोपीस निष्पन्न करून फरार आरोपींचा शोध घेउन यातील फरार आरोपी नामे शक्तीमान अविनाश उर्फ हनम्या काळे वय २५ वर्षे रा. माळेगाव खुर्द ता. बारामती जि. पुणे सध्या रा. कांबळेश्वर ता. बारामती जि. पुणे यास सदर गुन्हयाचे कामी अटक करून गुन्हयात चोरी गेलेला माला १) १८००००/-रू. किंमतीचे घुंगरू मनी असलेले सोन्याचे अंदाचे १८ ग्रॅम वजनाचे गंठण, २) ५००००/- रू किंमतीचे सोन्याचे टॉप्स कर्नफुले ५ ग्रॅम वजनाचे दागीने असे एकुण २३००००/- रू. किंमतीचे सोन्याचे दागीने पंचनामा करून गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आले आहेत. यातील अटक आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा अटक आरोपी, एक विधी संघर्ष ग्रस्त बालक व २ फरारी आरोपी यांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील फरारी आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी, हे करीत आहेत. सदर गुन्ह्यात आणखी गुन्ह्याची उघड होण्याची शक्यता आहे. तसेच सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी पुढील गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे

१) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन

१) गुरनं १८०/२०२६ बी.एन.एस. कलम ३११,३३१(६), ३(५).

२) गुरनं १३८/२०२६ बी.एन.एस. कलम ३३१ (४), ३०५,६२. हे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

सदरची कारवाई माननीय संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, वरिष्ट पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर स्था.गु.शा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी, पोलीस हवालदार अनिल खेडकर, कल्याण खांडेकर, हदयनाथ देवकर, भाउसाहेब मारकड, पोलीस शिपाई आबा जाधव, धनंजय भोसले, नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, नागनाथ परगे, विकास येटाळे, भानुदास सरक यांनी तसेच स्था.गु. शाखा यांचेकडील पोसई सुधीर वाळुंज, ग्रेड पोसई कारंडे, भोकरे, पोलीस अंमलदार निकम, तेलंग, होळकर, पाटील, अहिवळे, नाळे, स्वामी, डांगे यांनी मिळून केली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi