मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
सामाजिक

आरटीई 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु, १७ मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी-विश्वजित मुंडे.

mnewsmarathi 02 Mar 2023 1 मिनिट वाचन 9,811 वाचन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RTE अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळेमध्ये 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या २५% जागांवर दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी बुधवार दि.01/03/2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.17/03/2023 ही आहे. तरी पालकांनी ऑनलाईन अर्ज परळीतील एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र असलेले सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र येथे भरावेत असे आवाहन परळीतील एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चे संचालक विश्वजीत मुंडे यांनी केले आहे.


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कायम विनाअनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25% राखीव जागांसाठी सन 2023-2024 करीता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. सदर प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्याला शाळा मिळाल्यास पालकांचे वार्षिक उत्पन्न दाखला, पालकाचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, पालकाचे जात प्रमाणपत्र, पालकाचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे. तसेच शासनाने शिक्षणापासून मुले वंचित राहू नये गरीब मुलांनादेखील अद्यावत व गुणवत्तापूर्वक इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरु केली आहे. या मोफत प्रवेशा पोटी फीचा परतावा शासन करणार आहे. अशा महत्वपूर्ण व आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.तेव्हा पालकांनी आपला वेळ न दडविता ऑनलाईन अर्ज अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी परळीतील एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास भेट देऊन आपला अर्ज भरून घेण्यात यावा असे आव्हान विश्वजीत मुंडे (9158363277) यांनी केले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi