मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 08 March 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मु . सा काकडे महाविद्यालयात मुलींच्या कबड्डी स्पर्धा

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 8, 2023 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर :- मु .सा काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुलींच्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . देविदास वायदांडे यांनी केले . उद्घाटनापर मनोगतामध्ये त्यांनी मुलींनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा. खेळाकडे करिअर म्हणून पहावे तसेच आपल्या आरोग्यासाठी क्रीडास्पर्धामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त तंदुरुस्त रहावे.

महाविद्यालयातर्फे मुलींना क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त मदत केली जाईल . क्रीडासाहित्य तसेच स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा महाविद्यालयातर्फे पुरवल्या जातील जास्तीत जास्त मुलींना या क्षेत्राकडे वळावे असे त्यांनी सांगितले . याप्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री सतीश लकडे उपस्थित होते . त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जया कदम डॉ कल्याणी जगताप व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या . स्पर्धेत एकूण ६ कबड्डी महिला संघानी सहभाग नोंदवला होता राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यश गायकवाड यांनी पंच म्हणून काम पाहिले या स्पर्धेचे नियोजन महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे करण्यात आले होते. डॉ. बाळासाहेब मरगजे . प्रा. दत्तराज जगताप कर्मचारी श्री. आदित्य लकडे यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले . महाविद्यालय नियोजन आणि विकास समिती अध्यक्ष श्री अभिजीत काकडे देशमुख यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख