प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथील निखिल पोपटराव यादव यानी आपल्या अपंगत्वावर मात करत जिद्द व चिकाटीने दहावीच्या परीक्षेत ७२.८० % गुण मिळवून यश मिळवले आहे. म्हणतात ना मनात काही करून दाखवण्याची जिद्द असली तर काहीच अशक्य नाही. असेच एक उदाहरण म्हणजे निखिलचे आहे . निखिल हा हातापायाने अपंग आहे त्याने बारामती तालुक्यातील होळ मधील आनंद विद्यालय होळ येथे दहावीचे शिक्षण घेतले व त्याचे प्राथमिक शिक्षण तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाले. शाळेमध्ये जाताना निखिल ला उचलून घेऊन जावे लागायचे .
संपूर्ण जीवन परावलंबी असलेल्या निखिल कडे गुणवत्ता मात्र ठासून भरली आहे . त्याला एकदा शिकवलेले त्याच्या चांगले लक्षात राहते त्याच प्रकारे त्याचे हस्ताक्षर ही चांगले आहे . परंतु वेळ आधिक लागत असल्यामुळे दहावीच्या परीक्षेसाठी त्याला लेखणीक रायटर घ्यावा लागला राणी गोविंद दोडमिसे ही इयत्ता नववीत शिक्षण घेणारी मुलगी निखिल साठी लेखनिक होती . ठराविक वेळेत लेखनिकाच्या मदतीने लिहिलेला पेपर आणि मिळवलेले उत्तम गुण परिसरात सर्व मुलांसाठी एक आदर्श बनला आहे.
निखिल आपल्या हाताने मोबाईल हे उत्तम प्रकारे हाताळतो आणि सोशल मीडियावरील माहिती मिळवत असतो . अपंगत्व आले म्हणजे सगळे संपले असे नाही हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे .
निखिल ला वर्गमित्र आणि शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे यश मिळवता आल्याचे यावेळी निखिलने सांगितले . त्याच्या वर्ग मित्रांनी देखील निखिल ला सहकार्य केले.
जन्मताच अपंगत्व आसलेल्या आपल्या मुलाने दहावीच्या परीक्षेत चांगले व उत्तम गुण मिळाल्याबद्दल वडील , आई ,बहीण व यादव कुटुंबांनी यांनी आनंद व्यक्त केला .