मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 24 August 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मोक्का मधील आरोपीचा व्हिडिओ व मुळशी पॅटर्न मधील हा डायलॉग ठेवणे पडले महागात.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 24, 2023 1 मिनिट वाचन 8,517 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

मुळशी पॅटर्न मधील डायलॉग व मोक्का मधील आरोपींचे व्हिडिओ स्टेटसला ठेवणारा आरोपी .किरण भीमराव लकडे वय २३ वर्षे रा.लकडे वस्ती , माळेगाव ता.बारामती यास माळेगाव पोलीस स्टेशनकडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151 (3) प्रमाणे कायदेशीर कारवाई केली असून या आरोपीस सहा दिवस न्यायालयीन कोठडी माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, बारामती यांनी सुनावली आहे.

सदर बाबत माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री इंगळे साहेब यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना सूचना केल्याप्रमाणे तात्काळ सूत्रे हलवून सदर आरोपीस पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे व पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर व स्टाफ यांच्या मदतीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151 प्रमाणे अटक करून त्याचा पूर्व इतिहास व भविष्यकाळातील सण-उत्सव याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या हातून दखलपात्र स्वरूपाचा अगर खुणासारखा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने त्यास मा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक 28 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अशाप्रकारे सोशलमिडीया द्वारे दहशत पसरविणारे व्यक्ती यांचेविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. किरण अवचर यांनी सांगितले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख