संपादक मधुकर बनसोडे.
१९७२ साली मोसमी पाऊस वेळेवर झालाच नाही, झाला तो पावसाळ्याच्या शेवटाला म्हणजे सप्टेंबर मध्ये समजा.त्यामुळे खरीपाची पेरणी झाली नाही.तो कोरडा दुष्काळ असला तरी पाण्याची टंचाई नव्हती,जमीनीत पाणी भरपूर होते पण ते पिकांना द्यायला सिंचन सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की, कुठल्याही पिकाचे उत्पादन आजच्या तुलनेत खुपच कमी होते.अगदी चांगले पिकले तरी ते अन्नधान्य वर्षभरासाठीच पुरवायचे.त्यातून १९७२ साली पेरणीच नसल्यामुळे अन्नधान्याची टंचाई होती.जमीनदार लोकांची परिस्थिती बरी असली तरी गोरगरीबांचे हाल होते.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी व सामान्य वर्गावरती दुष्काळाचे मोठे सावट निर्माण झालेली आहे. याचबरोबर पशुधनाला जगवावे कशी हा देखील मोठा प्रश्न पशुपालकांच्या समोर उभा राहिलेला आहे. पाऊस पडला नाही तर १९७२ च्या आठवणी आज ताज्या झाल्या शिवाय राहणार नाही. २०२३ च्या वर्षांमध्ये १९७२ च्या दुष्काळाच्या झळ्या बसतायेत की काय या भीतीने सामान्य नागरिक चिंता तुर झाला आहे. या हंगामा मधील बाजरीचे पीक, ज्वारी, मका, सोयाबीन, संपुष्टात येण्याची दाट चिन्ह आहेत त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कडधान्याचे भाव गगनाला भिडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि याचा फायदा कोणत्याही शेतकऱ्याला न होता व्यापाराला होणार आहे.
भारतात सुकाळ व दुष्काळ हे मान्सून च्या पर्जन्यमानावर अवलंबून असतो.मान्सून हा पॅसिफिक महासागरातील गरम पाण्याच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या प्रवाहावर अवलंबून असतो.हा प्रवाह जसा पुर्व किंवा पश्चिमेकडे सरकेल तसे पर्जन्यमान असते.हे निसर्ग चक्र आहे.ते नेहमी बदलत असते.मानवी इतिहास व धर्म ग्रंथात दुष्काळाच्या नोंदी आहेत.मानवी हस्तक्षेपामुळे ही बराच बदल होत आहे.आकाशात ढग असतील तरच वृक्षांमुळे पाऊस पडतो.नुसते वृक्ष लागवड करुन पाऊस पडत नाही.शिवाजी महाराजांच्या काळातही दुष्काळ पडला होता.बंगालचा तीव्र दुष्काळ सुद्धा आपल्याला माहीत आहे. बायबलमध्ये अब्राहामाच्या काळात,नंतर त्याच्या पुत्राच्या काळात, त्याच्या नातवाच्या काळात आणि नंतर इस्रायल राजांच्या काळात अनेकदा दुष्काळाची नोंद आहे.ऋग्वेदात दुष्काळ येऊ नये म्हणून ऋषी मुनी इंद्र देवाला यज्ञ करीत.तात्पर्य हे निसर्ग चक्र आहे.मानवी हस्तक्षेपामुळे ते आणखी बिघडते.१९७२ चा दुष्काळ पडला तो अशाच कारणांमुळे.तेंव्हा लाल ज्वारी,लाल गहू मक्याच्या पिवळ्या भाकरी बहूतेकांनी खाल्यात.वेळ खूप कठीण होती. तशी अजूनही वेळ गेलेली नाही राज्य सरकार लाखो रुपये खर्च करून दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करत असते मात्र काही नेते दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण करीत आहे? झाडे लावा झाडे जगवा या म्हणी प्रमाणे झाडे जगवली देखील पाहिजे जर ते प्रामाणिकपणाने केले तर येणाऱ्या वर्षात किमान पर्जन्यमान चांगले पडेल व येणाऱ्या पिढीला अशा १९७२ सारख्या दुष्काळाच्या झळया सोसाव्या लागणार नाहीत