संपादक मधुकर बनसोडे.
निरा सोमेश्वर परिसरामध्ये महावितरण ची कोणतीही परवानगी न घेता महावितरणच्या विद्युत पोलवरून अनधिकृतपणे केबल वायर टाकून राजरोसपणे आपला व्यवसाय करणाऱ्या केबल चालकांवरती महावितरण गुन्हा दाखल करणार का? मीटर भाडे असेल विद्युत वाहन कर असेल हे सर्व कर महावितरण चे ग्राहक भरतात मात्र त्याच महावितरणच्या पोल वरून अनाधिकृतपणे केबल वायर टाकून व्यवसाय करणाऱ्या केबलच्या लोकांना महावितरण का सूट देत आहे असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.
विद्युत पोल वरून सप्लाय चालू असताना देखील काही केबल चालक अल्पवयीन कामगारांना त्या खंबा वरती चढून दुरुस्तीचे काम करण्यास सांगत आहेत जर भविष्यात एखादा अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणचीच राहणार का? की केबल चालकांची विद्युत खांब ही प्रॉपर्टी महावितरणची असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी असा कोणताही अनर्थ होण्याअगोदरच विद्युत पोल वरून ज्यांनी केबल वायरस टाकल्या आहेत त्यांच्या वरती गुन्हा दाखल करावा.? अन्यथा येणाऱ्या काळामध्ये काही सामाजिक संघटना महावितरणच्या ऑफिस समोर बोंबाबोंब आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
आपण कोणतीही वस्तू घेतली तर नेहमीच त्या वस्तूचे बिल मागत असतो ते देणेही संबंधित व्यक्तीस बंधनकारक आहे.
मात्र या परिसरातील केबलचालक कोणतेही बिल न देता ग्राहकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
वास्तविक केबल चालकांना देखील केबलचे बिल देणे बंधनकारक आहे क?