• Home
  • माझा जिल्हा
  • परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; साताऱ्यातील सातजणांविरुद्ध गुन्हा
Image

परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; साताऱ्यातील सातजणांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

परदेशी चलन व्यवसायात (फाॅरेक्स ट्रेडींग) गुंतवणुकीच्या आमिषाने २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत तुकाराम मोरे (रा. गांधीनगर, सातारा), नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते (रा. कोळकी, सातारा), अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण (रा. मुनानगर, सातारा), शशिकला मारूती वादगावे, सुरेश गोरख कुंभार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहेत. आरोपींविरुद्ध फसवणूक, अपहार, तसे महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण काायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिगंबर पोपट गायकवाड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांना परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष आरोपींनी दाखविले होते. आरोपींनी एका वित्तीय संस्थेचे संचालक असल्याची बतावणी केली होती. गायकवाड यांनी आरोपींकडे २२ लाख ५० हजार रुपये दिले. सुरुवातीला आरोपींनी त्यांना परतावा दिला. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी गायकवाड यांच्यासह २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026