• Home
  • माझा जिल्हा
  • ग्राहकांसोबतचा सकारात्मक संवाद व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ठरतो – शशांक मोहिते.
Image

ग्राहकांसोबतचा सकारात्मक संवाद व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ठरतो – शशांक मोहिते.

प्रतिनिधी –

बारामती बिजनेस चौक या माध्यमातून बारामती मधील व्यवसायिकांसाठी एक व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. बारामती परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांपासून सर्वच क्षेत्रातील लोकांचा यामध्ये समावेश आहे. “बीबीसी” च्या माध्यमातून वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित केली जातात. संवाद तीन या चर्चासत्रामध्ये शशांक मोहिते, सुप्रसिद्ध भाषण कला व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक यांनी व्यवसायातील ग्राहकांचा सुसंवाद या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सकारात्मक सुसंवाद ही एक कला आहे आणि त्यातूनच आपण अधिक ग्राहक जोडून आपला व्यवसाय वाढवू शकतो. संवादातील व्हेरिएशन असो किंवा समोरच्या ला काय हवं आहे हे त्याच्याकडून बोलत करून त्याला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोजच्या ग्राहकांसोबत होणारा संवाद हा सकारात्मक असेल तर तो ग्राहक कायमस्वरूपी आपला होऊन अप्रत्यक्षरीत्या व्यवसाय वाढीसाठी मदत करतो.

 हा कार्यक्रम मोतीबाग इंदापूररोड बारामती येथील अन्नपूर्णा हॉटेल मध्ये शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता घेण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये महिला व्यवसायिकांचा देखील सहभाग होता. या कार्यक्रमासाठी दौंड, कुरकुभ, भिगवन, फलटण, बारामती परिसरातील 67 व्यवसायिकांनी व नव उद्योजकांनी सहभाग नोंदवला.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026