विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करणारी टोळी अटकेत

क्राईम

प्रतिनिधी

विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करुन वाढीव दराने विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सोमाटणे टोल नाक्याजवळ काळा बाजार सुरु असताना पोलिसांनी बुधवारी कारवाई करत इंधनाचे दोन टँकर ताब्यात घेतले आहेत.

मंगेश सखाराम दाभाडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे), इलाही सैफन फरास (वय ४५, रा. धानोरी, पुणे), अनिल सतईराम जस्वाल (वय २८, रा. उत्तरप्रदेश), अमोल बाळासाहेब गराडे (वय ३१, रा. पिंपळखुटे, ता. मावळ) आणि परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड (वय ३६, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सोमाटणे टोल नाक्याजवळ विमानाला लागणारे इंधन (एटीएफ/जेट इंधन) टँकरमधून काढून त्याची विक्री करण्याचा काळा बाजार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. जागा मालक मंगेश दाभाडे याने टँकर चालक ईलाही आणि अनिल या दोघांशी संगनमत करून अमोल आणि परशुराम याच्या मदतीने टँकरमधून जेट इंधन काढून घेत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.