• Home
  • माझा जिल्हा
  • मौजे सोमेश्वरनगर येथे १०० खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित*
Image

मौजे सोमेश्वरनगर येथे १०० खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित*

बारामती, दि.१६: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या संस्थेच्या अधिनस्त १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती परिसरातील नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमेश्वरनगर येथे १०० खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्यात येणार आहे. या आरोग्य पथकाकरीता उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामाकरीता एकूण रू.७७ कोटी ७९ लाख इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इमारतीमध्ये दिव्यांगाकरीता विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत, पदनिर्मिती, यंत्रसामुग्री व साधनसामुग्री इत्यादीबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे सोमेश्वरनगर परिसरातील नागरिक, ऊसतोड कामगार, संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याच्यावेळी येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्यविषयक सोई-सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026