बारामती..ग्रामपंचायत सदस्य च,होऊ लागले सब ठेकेदार.?निकृष्ट कामांच्या दर्जात वाढ बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज.

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

सध्या बारामती तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायत सदस्य सब ठेकेदाराच्या भूमिकेत दिसून येत आहेत. गावच्या विकासासाठी जनतेच्या हाता पाया पडून मत मागणारे उमेदवार सदस्य होताच स्वतःचा विकास करून घेण्यासाठी ठेकेदाराच्या भूमिकेत दिसत आहेत बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये विकास कामे सुरू आहेत मात्र टेंडर एकाच्या नावाने असते आणि काम करणारा ग्रामपंचायत सदस्य सब ठेकेदार म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत अनेक ठिकाणी पक्षश्रेष्ठी देखील स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी ज्यांना गावच्या विकासाचं कोणतही देणंघेणं नाही अशा लोकांना भविष्यात त्यांचा राजकीय फायदा घेता यावा यासाठी संबंधित ठेकेदाराकडून असे सब ठेकेदार तयार करण्यास सांगत आहेत. ठेकेदाराचे कमिशन वेगळे, ज्याने काम मिळवून दिले त्याचे कमिशन वेगळे, सब ठेकेदाराचे कमिशन वेगळे काढले तर संबंधित काम हे निकृष्ट दर्जेचेच होणार यात तीळ मात्र शंका नाही. जनता उपाशी आणि ग्रामपंचायत सदस्य सब ठेकेदाराच्या रूपाने तुपाशी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संबंधित प्रशासन खरंच इस्टिमेट प्रमाणे काम होतं का, त्या कामासाठी आणलेले मटेरियल योग्य क्वालिटीचे आहे का याची खातरजमा खरंच करतं का हे देखील पाहणं गरजेचे आहे.
जर मटेरियल योग्य क्वालिटीचे असेल तर मटेरियल टेस्टिंग चा रिपोर्ट संबंधित विभागाकडून जनतेसाठी उपलब्ध करून द्यावा.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अशा सब ठेकेदारांना व त्या पक्षश्रेष्ठींना जनता जनार्दन योग्य जागा दाखवेल का?