बारामती ! वडगाव निंबाळकर मधील कृषी विभाग कार्यालयामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात .?

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यातील सर्व सरकारी कामकाजाच्या इमारती उत्तम प्रकारे बांधल्या जात आहेत मात्र वडगाव निंबाळकर येथील कृषी विभाग मंडल कृषी अधिकारी कार्यालय ह्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का ? वडगाव निंबाळकर येथील कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने तेथील अधिकारी ,कर्मचारी व त्या कार्यालयात येणारे शेतकरी यांना या इमरतीपासून जीवाला धोका असल्याचे चित्र दिसून येत आहे .

नागरिकांमध्ये चर्चा आहे की ही कृषी कार्यालय आहे का कुणाचे जुने पडके घर . या इमारतीमध्ये अधिकाऱ्यांचे कॉम्प्यूटर , मूळ कागदपत्र असतात मात्र या इमारतीचा पत्रा फुटल्याने पावसाळ्यात या पत्र्यातून पाणी येऊन कागदपत्रांची व कॉम्प्युटरांचे नुकसान होणार हे मात्र नक्की .
या इमारतीच्या भिंतीमध्येच झाडांची मुळी वर येऊन भिंतीला चिरा पडल्या आहेत ही भिंत केव्हा पडेल याचा अंदाज लावता येनार नाही जर ही भिंत पडून कुणाला इजा पोचली तर याला जबाबदार कोण ?.

वडगाव निंबाळकर मधील कृषी विभाग कार्यालयाच्या इमारतीकडे प्रशासनाने लक्ष्य घालून अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना सोयीस्कर होईल अशी त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी इमारत बांधावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत  आहे .