Image

मेळघाटात कारची दुचाकीला धडक, चार जण ठार

प्रतिनिधी

मेळघाटातील घुटी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्‍यू झाला. मृतांमध्‍ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ४ वाजताच्‍या सुमारास घडला. दादू भब्‍बा दारशिंबे (२७, रा. सावऱ्या), दादू याची पत्‍नी शारदा दारशिंबे (२४) आणि त्‍यांची दोन लहान मुले या अपघातात ठार झाली आहेत.

होळीच्या सणानिमित्त दारशिंबे कुटुंबातील चार जण दुचाकी वाहनाने धारणी शहरात होळी सणानिमित्‍त बाजार करण्यासाठी आले होते. बाजारातील साहित्‍य खरेदी करून हे कुंटुंब आपल्या मूळ गावी सावऱ्या येथे परतीच्या मार्गावर होते. घुटी गावाजवळ एमएच २९ / ऐ आर १४५६ या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दादु भब्बा दारशिबे, शारदा दारशिबे व त्यांची दोन मुले जागीच ठार झाले.

सावऱ्या येथील गावकऱ्यांची होळी काळी ठरली आहे. सध्या मेळघाटातील सर्वच गावांमध्‍ये होळी सणाची लगबग सुरू आहे. साहित्य खरेदीसाठी खेड्यातील लोक बाजार करण्यासाठी धारणीच्या बाजारपेठेत येत असतात. दारशिंबे हे आपल्या दुचाकी वाहनाने धारणीत आले होते. बाजार करून परत गावाकडे जात असताना हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन बालके दुचाचाकी वाहनाच्या समोर पेट्रोल टाकीवर बसले होते. कारची धडक एवढी जबर होती की, चारही जण दुचाकीवरून दूर फेकले गेले आणि जागीच ठार झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026