• Home
  • क्राईम
  • आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक
Image

आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक

प्रतिनिधी

कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेने कोंढवा भागातून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून दहा लाख रुपयांचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. फरार झालेला तस्कर गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो कोंढव्यात राहणाऱ्या आईला भेटायला आला असताना पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.

शोएब सईद शेख (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मेफेड्रोन तस्करीचा प्रकार उघडकीस आणला. विश्रांतवाडी, कुरकुंभ ओैद्योगिक वसाहत, दिल्ली, तसेच सांगली शहरात छापे टाकून पोलिसांनी तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. मेफेड्रोन तस्करीचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया, अशोक मंडल, वीरेंद्रसिंग बसोया फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शोएब शेख पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.

शेख आईला भेटण्यासाठी कोंढवा भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जळगाव, पंढरपूर, शिर्डीला पसार झाला होता. मेफेड्रोन विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या हैदर शेखच्या माध्यमातून तो मेफेड्रोनचा पुरवठा, गोदामात साठवणूक करत होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे आणि पथकाने ही कारवाई केली.

Releated Posts

एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक

प्रतिनिधी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने एका मोठ्या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील पाहिजे…

ByBymnewsmarathi Jun 9, 2026

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026