• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील कु.स्नेहा वेदपाठक हिने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष स्पर्धेत संकल्पना नृत्य प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले*
Image

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील कु.स्नेहा वेदपाठक हिने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष स्पर्धेत संकल्पना नृत्य प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले*

प्रतिनिधी.

सन २०२३-२४ वर्षातील उत्कर्ष- राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे दि १७ ते २० मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघामधून १८ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका कु स्नेहा उत्तम वेदपाठक हिची संकल्पना नृत्य या प्रकारासाठी निवड झाली होती. यामध्ये तिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या गौरवस्पद कामगिरीसाठी स्नेहाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश निकाळजे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन मिळाले .

श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्नेहा व तिच्या पालकांचा संस्थेचे संचालक प्रतिनिधी श्री आनंदकुमार होळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळेस संस्थेचे सचिव श्री भारत खोमणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस बी सूर्यवंशी, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, एमबीए कॉलेजचे डायरेक्टर डॉ. निलेश लिंबोरे व इतर प्राध्यापक , प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम जगताप , उपाध्यक्ष श्री बाळासाहेब कामथे व इतर सर्व संचालक मंडळ यांनीही स्नेहा वेदपाठकचे या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन केले.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026